Category Archives: adhyapika vidyalaya

अध्यापिका विद्यालयाचा शताब्दी सोहळा

बा. मो. वा. सेवासदन अध्यापिका विद्यालयाचा शताब्दी महोत्सव ओगस्ट २०१३ पासून वर्षभर साजरा करण्यात येणार आहे.   शताब्दी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा १० ऑगस्ट २०१३ रोजी आदरणीय रमाबाईसाहेब  रानडे यांच्या पणती डॉ वसुधाताई आपटे , नायब तहसीलदार सौ. सुरेखा ढोले ( माजी विद्यार्थीनी ) व अभिनेते विक्रम गायकवाड , अभिनेत्री स्पृहा जोशी ( उंच माझा झोका मालिकेतील न्यायमूर्ती माधवराव रानडे व रमाबाई ) यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. अध्यक्षस्थानी मा. शशीताई किर्लोस्कर होत्या.

शताब्दी वर्षामध्ये अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून १७.११.२०१३ रोजी कृष्णसुंदर लॉन्स येथे माजी विद्यार्थीनी स्नेह मेळावा आयोजित केला गेला. त्यासाठी सुमारे ५०८ विद्यार्थीनी हजर होत्या.

याप्रसंगी सुप्रसिद्ध सिनेकलावंत श्री राहुल सोलापूरकर व शिक्षणतज्ञ मा मीना चंदावरकर उपस्थित होते. मा मीना चंदावरकर यांनी शिक्षणातील समस्या , मनोरंजकता व इतर गोष्टींबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी अध्यापिका विद्यालयात १९४७ ते १९५० या काळात शिक्षण घेतलेल्या ८६ वर्षांच्या श्रीमती कांबळे या माजी विद्यार्थीनी हजर होत्या व त्यांनी सेवासदनच्या आठवणी सांगीतल्या.  सेवासदनमुळेच मी सुखी व समाधानी आयुष्य जगू शकल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा शशीताई किर्लोस्कर होत्या.   तसेच शिक्षणतज्ञ व शालेय समितीचे अध्यक्ष मा. श्रीधर पाटणकर , व्यवस्थापकीय अधिकारी मा. चिंतामणी पटवर्धन तसेच सुनालीनी सत्तूर याही उपस्थित होत्या.

यावेळी संस्थेतील माजी प्राध्यापक , लिपिक , सेवक , कै. ध. रा. पोंक्षे सराव पाठशाळेतील शिक्षिका , रमाबाई रानडे प्रौढ प्राथमिक शाळेच्या श्रीमती येनपुरे , प्राचार्या स्वाती गाडगीळ व नगरसेविका मेधा कुलकर्णी या सर्वांच्या प्रयत्नामुळे हा सोहळा अत्यंत सुंदररीत्या संपन्न झाला. संस्थेतील नामवंत माजी विद्यार्थिनी , माजी प्राध्यापक , माजी प्राचार्य यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला व उपस्थितांना सेवासदन स्मरणवही भेट म्हणून देण्यात आली.